साक्षी राऊत
बदाम आरोग्यासाठी फार चांगली असते. त्यात व्हिटॅमिन ए, बी, सी आणि ई तसेच मॅग्नेशियम, फॉस्फोरस सारखे पोषक तत्व असतात.
तुम्ही योग्य प्रकारे बदामचे सेवन कराल तुमची स्मरणशक्ती वाढते.
बदाम खाण्याची ही योग्य पद्धत आहे ज्यामुळे तुम्हाला आश्चर्यकारक फायदे मिळतील.
बदामचे सेवन करण्यासाठी आधी त्याला रात्रभर पाण्यात भिजवून ठेवा आणि सकाळी उपाशीपोटी खा. बदाम भिजवून ठेवल्यामुळे ती शरीरासाठी थंड असते.
बदाममध्ये मोठ्या प्रमाणात अँटीऑक्सिडंट्स असतात. ज्यामुळे तुमची पचनशक्ती चांगली राहते. आणि अनेक आजारांपासून तुमचा बचाव होतो.
बदाममध्ये फायबरची मात्रा अधिक असते. यामुळे तुमचं पोट दीर्घकाळ भरलेलं असतं. आणि तुमचं वजन कमी होण्यासही मदत होते.
यात असलेल्या व्हिटॅमिन ई मुळे सुरकुत्या फाइन लाइन्सची समस्या दूर होते.
बदाममध्ये असलेल्या फॉस्फरसमुळे हाडे आणि दात मजबूत होतात.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.