Sudesh
फेसबुक, इन्स्टा, एक्स (ट्विटर) अशा कित्येक सोशल मीडिया अॅप्समुळे एकमेकांच्या संपर्कात राहणं अगदी सोपं झालं आहे. मात्र हे तंत्रज्ञान एकप्रकारे दुधारी तलवार ठरत आहे.
सोशल मीडियाच्या अति वापरामुळे कित्येक लहान मुलांमध्ये आणि तरुणांमध्ये मानसिक आरोग्यासंबंधी समस्या दिसून येत आहेत.
त्यामुळे सोशल मीडिया वापरत असताना स्वतःला सांभाळणं देखील गरजेचं असतं. यासाठी आम्ही तुम्हाला काही टिप्स सांगणार आहोत.
सोशल मीडियामुळे तणाव येत असल्यावर सर्वात आधी तर त्याचा वापर कमी करणं गरजेचं आहे. दिवसातून ठराविक वेळच सोशल मीडिया वापरण्याचा निर्धार करा, आणि ते फॉलो करा.
सोशल मीडिया वापरताना आपल्या मनावर लक्ष ठेवा. तुमच्यावर याचा सकारात्मक प्रभाव पडतोय की नकारात्मक हे लक्षात घ्या. यानुसार तुम्हाला तुमच्या सवयीत बदल करणं सोपं जाईल.
सोशल मीडियावर कित्येक प्रमाणात दिशाभूल करणारा कंटेंट उपलब्ध आहे. मात्र, त्यावर टाईमपास करण्याऐवजी तुम्हाला फायद्याचे ठरतील असे पेजेस किंवा चॅनल्स फॉलो करा.
सोशल मीडियावर तुम्ही काही पोस्ट करत असाल, तर ते केवळ लाईक्स मिळवण्याच्या उद्देशाने करू नका. तुम्ही जसं आहात, तसंच स्वतःला दाखवण्याचा प्रयत्न करा.
काही काळ सोशल मीडियावरुन ब्रेक घेणंही गरजेचं आहे. मित्रांसोबत बाहेर जा, सोलो ट्रिप करा, एखाद्या चांगल्या ठिकाणाला भेट द्या. मोबाईलच्या बाहेर जे जग आहे तेदेखील अनुभवा.
तुमच्या गरजेनुसार ठराविक कालावधीनंतर सर्व सोशल मीडियावरुन गायब व्हा. मानसिक आरोग्यासाठी हा ब्रेक अगदी गरजेचा आहे. मेंदूला रिफ्रेश केल्यानंतर पुन्हा एकदा काही काळासाठी तुम्ही सोशल मीडिया वापरू शकता.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.