Sudesh
विरंगुळा म्हणून, किंवा नवीन लोकांशी संपर्क वाढवण्याच्या दृष्टीने कित्येक लोक सोशल मीडियाचा वापर करतात.
फेसबुक, इन्स्टाग्राम अशा सोशल मीडियांवरुन कित्येक नवे 'फ्रेंड्स' जोडले जातात. कालांतराने चॅटिंग वाढून व्हॉट्सअप नंबरही शेअर केले जातात.
याच माध्यमातून कित्येक लोकांची फसवणूक झाली आहे. कोणाला खोटं बोलून, तर कोणाला हनी ट्रॅपमध्ये अडकवत ब्लॅकमेल करून पैसे उकळण्याचं प्रमाण वाढलं आहे. त्यामुळे सोशल मीडिया वापरताना आपल्या सुरक्षेसाठी काही खबरदारी घेणं गरजेचं आहे.
व्हॉट्सअप हॅक करून आपल्या संपर्कातील व्यक्तींना पैशांची मागणी केली जाऊ शकते. त्यामुळे व्हॉट्अप चॅट बॅकअप मिळवण्यासाठी आलेली विनंती स्वीकारू नका.
फेसबुकवर व्हॉट्सअपचा डेटा शेअर करू नका. प्रोफाईलवर तुमचा नंबर इतरांना दिसणार नाही याची खबरदारी घ्या.
तुम्हाला आलेल्या ब्रेकिंग न्यूज, किंवा इतर आकर्षक प्रलोभने दाखवणाऱ्या लिंक खात्री केल्याशिवाय ओपन करू नका.
स्वतःची खासगी माहिती, कुटुंबाची माहिती, फोटो हे फेसबुकवर शेअर करताना खबरदारी घ्या. शक्यतो अधिक गोष्टी अपलोड करणे टाळा.
अनोळखी व्यक्तीशी फेसबुकवर चॅटिंग करताना खबरदारी घ्या. आपली वैयक्तिक माहिती देणं टाळा. किंवा मग थोडा संशय येताच अशा प्रोफाईल त्वरीत ब्लॉक करा.
तुम्हाला आलेला कोणताही ओटीपी अनोळखी व्यक्तींशी शेअर करू नका. बँकेसंबंधी काही कॉल किंवा मेसेज आल्यास थेट बँकेच्या शाखेत संपर्क साधा.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.