सकाळ डिजिटल टीम
बटाटा सामान्यतः बहुतेक घरांच्या स्वयंपाकघरात आढळतो. बटाटे बऱ्याच काळासाठी साठवले जाऊ शकतात.
मात्र, काही काळानंतर बटाटे कधी कधी हिरवे होतात, जे तुमच्या आरोग्यासाठी हानिकारक ठरतात. अशा प्रकारे शिजवलेले बटाटे खाल्ल्याने महिलेचा जीव धोक्यात आला होता.
असाच एक साधा बटाटा तुमच्या आरोग्यासाठी घातक ठरत आहे. मारिया हार्लेस (Maria Harless) नावाच्या महिलेला बटाटे खावेसे वाटले. त्यानंतर तिने बटाटे शिजवून खाल्ले. यानंतर काही वेळातच त्यांना तीव्र डोकेदुखी, मळमळ, उलट्या आणि पोटदुखीचा त्रास होऊ लागला. आता त्या इतरांना बटाट्याच्या धोक्यांबद्दल सावध करत आहेत.
बटाटे जास्त काळ टिकून राहू शकतात. मात्र, त्याची योग्यरित्या काळजी घेणे गरजेचे असते. जास्त प्रकाश किंवा तापमानात ठेवल्यास बटाटा हिरवा होऊ लागतो.
बटाट्याचा हिरवा भाग सोलानाइन असतो. अशा प्रकारचे बटाटे खाण्यास मनाई आहे. कारण, कधी-कधी या विषामुळे माणसाचा मृत्यूही होऊ शकतो. याचे सेवन केल्याने जुलाब आणि डोकेदुखीचा त्रास होतो.
1979 मध्ये असे बटाटे खाल्ल्याने शाळेतील कॅफेटेरियामध्ये 78 शाळकरी मुले आजारी पडली. 1899 मध्ये 56 जर्मन सैनिकांनाही अशीच समस्या आली होती. 1925 मध्ये सात जणांच्या कुटुंबाला सोलानाइनने विषबाधा झाली, त्यापैकी दोन जण मरण पावले.
तज्ञ सांगतात, कोणत्याही बटाट्याचे हिरवे भाग शिजवण्यापूर्वी ते कापून टाकण्याचा सल्ला देतात. तसेच हिरव्या बटाट्याचे गोठलेले भाग पूर्णपणे काढून टाका, कारण त्यात Solanine चे प्रमाण जास्त असते.