सकाळ डिजिटल टीम
अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाने झहीर इकबालशी मुंबईत थाटात लग्नगाठ बांधली.
सोनाक्षी बरोबरच सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं ते सोनाक्षीची सुंदर करवली हुमाने. खास मैत्रिणीच्या लग्नासाठी हुमाही सुंदर नटली होती.
मोतिया रंगाची साडी, केसात माळलेले गुलाब आणि साजेसा मेकअप या लूकमध्ये हुमा मोहक दिसत होती.
तिचा हा लूक चांगलाच व्हायरल झालाय. तिने या फोटोंना 'Keep it simply fabulous always' असं कॅप्शन दिलं आहे.
या बरोबरच तिचा साडीतील दुसरा लूकही गाजला. पिंक रंगाच्या ड्रेसमध्ये हुमा अतिशय मोहक दिसत होती.
साजेसा मेकअप, डायमंडचे कानातले आणि केसात माळलेले पिंक रंगाचे गुलाब या लूकने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं.
हुमाने या फोटोला 'लाजलेली करवली' असं कॅप्शन दिलं आहे.
तिचे हे फोटो व्हायरल झाले असून अनेकांना ही करवली पसंत पडली आहे. 'डबल एक्सएल' या सिनेमानंतर सोनाक्षी आणि हुमा एकमेकींच्या बेस्ट फ्रेंड झाल्या आहेत.