Anuradha Vipat
नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत सोनाक्षीने पहिल्यांदाच तिच्या लग्नाविषयी थेट भाष्य केलं आहे.
सोनाक्षीच्या लग्नाला काही लोकांनी ‘लव्ह जिहाद’चे नाव दिले होते.
यामुळे सोनाक्षी ट्रोल देखील झाली. मात्र, आता तिने आपल्या लग्नावर स्वतः प्रतिक्रिया दिली आहे.
बोलताना सोनाक्षी म्हणाली की, ‘मला वाटते की माझ्या लग्नाला सगळ्यांनीच हजेरी लावली होती.
पुढे सोनाक्षी म्हणाली की, आमच्या लग्नात त्यांचे पाहुणे आणि आमचे पाहुणे असं काही वेगळं नव्हतं. आम्हा दोघांचेही मित्र कॉमन असल्याने सगळे एकत्रच होते.
पुढे सोनाक्षी म्हणाली की, या सगळ्यादरम्यान 'काकुदा' या हॉरर कॉमेडीचित्रपटातून काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न करायला मिळाल्याचा मला आनंद झाला
‘एक अभिनेत्री म्हणून मी यापूर्वी कधीही हा जॉनर केला नव्हता. या चित्रपटाच्या निमित्ताने मी माझ्या कम्फर्ट झोनमधून बाहेर पडले’ असे देखील ती म्हणाली