Monika Lonkar –Kumbhar
बॉलिवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा तिचा बॉयफ्रेंड झहीर इक्बालसोबत २३ जून रोजी विवाहबंधनात अडकली.
या दोघांनी नोंदणी पद्धतीने विवाह केला. लग्नातील साोनाक्षीचा लूक मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता.
लग्नानंतर सोनाक्षीने रिसेप्शन पार्टी ठेवली होती. त्यासाठी तिने हा लाल बनारसी सिल्क साडीतला लूक केला होता.
या लाल बनारसी साडीवर तिने गळ्यात घातलेल्या हिरव्या रंगाच्या चोकरने अधिक लक्ष वेधून घेतले.
सोनाक्षीने गळ्यात घातलेला हा चोकर दिग्दर्शक निर्माता करण जोहरच्या ‘त्यानी ज्वेलरी’ (Tyani Jewellery) या ब्रॅंडचा आहे.
सोनाक्षीच्या या चोकरची आणि त्यावरील मॅचिंग कानातल्यांची एकूण किंमत तब्बल ४ लाख ६५ हजार रूपये आहे.
या महागड्या कुंदन चोकरने सोनाक्षीच्या लूकमध्ये आणखी भर घातली एवढ नक्की.