Anuradha Vipat
बॉलिवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा ही कायमच चर्चेत असते.
सोनाक्षी सिन्हाची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फॉलोइंग बघायला मिळते.
23 जुन 2024 ला सोनाक्षी सिन्हा आणि झहीर इक्बाल यांनी लग्न केले आहे.
आता सोनाक्षी सिन्हाने नुकतीच एक मुलाखत दिली आहे या मुलाखतीत तिने झहीर इक्बालबाबत एक खुलासा केला आहे
सोनाक्षी सिन्हा हिने सांगितले की पहिल्यांदा ज्यावेळी तिने तिच्या घरी झहीर इक्बाल याच्याबद्दल सांगितले त्यावेळी तिच्या घरच्यांची प्रतिक्रिया कशी होती.
पुढे सोनाक्षी सिन्हाने म्हटले की मी वडिलांना माझ्या आणि झहीरबद्दल ज्यावेळी सांगत होते त्यावेळी मी प्रचंड घाबरले होते.
पुढे सोनाक्षी सिन्हा म्हणाली की, माझ्या आयुष्यात झहीर नावाचा मुलगा आहे. यावर ते म्हणाले की, होय मी याबद्दल वाचले होते.