Anuradha Vipat
अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा गेल्या काही दिवसांपासून तिच्या लग्नामुळे मोठ्या चर्चेत होती.
आता मात्र सोनाक्षीने चित्रपटातील कामाबाबत केलेल्या वक्तव्यामुळे चर्चेत आली आहे
सोनाक्षी ‘काकुडा’ चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. या चित्रपटाबद्दल बोलताना सोनाक्षीने म्हटले आहे की, मला भयपट आवडत नाहीत, पण या चित्रपटात विनोददेखील आहे.
सोनाक्षी पुढे म्हणाली, या चित्रपटामुळे मी माझ्या कम्फर्ट झोनमधून बाहेर पडू शकले.
पुढे अशा चित्रपटात काम करणे मला पुन्हा आवडेल कारण या चित्रपटाचे शूटिंग करताना फार मजा आली असे सोनाक्षी सिन्हाने म्हटले आहे.
पुढे सोनाक्षी म्हणाली, मला मोठ्या आणि महत्त्वाच्या भूमिका करायला आवडतात. ‘
अकिरा’ चित्रपटात मी मुख्य भूमिकेमध्ये होते. मला चित्रपटातल्या दोन गाणी, चार सीनसाठी परत जायचे नाही. आत्ता जे मी करत आहे, त्याचा सध्या मी आनंद घेत आहे असंही पुढे सोनाक्षी म्हणाली