Amit Ujagare (अमित उजागरे)
अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हीला निसर्गरम्य ठिकाणी फिरण्याची आवड आहे.
जगभरातील विविध ठिकाणी तिनं आत्तापर्यंत सफारी केली आहे.
या सफारी दरम्यान ती बऱ्याचदा सुंदर फोटो सेशनही करते, हे फोटो ती सोशल मीडियावर शेअरही करत असते.
सध्या सोनाली लडाखमध्ये भटकंती करत आहे. या ठिकाणी तिनं लडाखमधील डोंगराळ भाग, वाळवंट, ग्लेशिअर, हिमनद्यांना भेटी दिल्या.
या भेटींचे सुंदर फोटो तीनं फेसबूकवर शेअर केले आहेत.
या फोटोत निसर्गानं लडाखवर केलेली मुक्त उधळण जशी नजरेस पडते तसंच सोनालीचं सौंदर्याचही तुम्ही कौतुक कराल.
निसर्गच्या सौंदर्यात सोनालीचा शांत, सोज्वळ अन् कॅज्युअल लूकही भाव खाऊन गेला आहे.
हिमालयातून खळाळून वाहणारी अन् समुद्राच्या भेटीसाठी आतूर झालेली श्योक नदी मनाला भावते.
त्याचबरोबर इथला धबधबा, ग्लेशिअर हे ही मन प्रसन्न करतं.
सोनालीनं लडाखच्या शांत निर्मनुष्य रस्त्यांवर ठाण मांडून दिलेली पोझही तिच्या चाहत्यांना आवडली असेलच.
निसर्गाची ही सर्व उधळण पाहून सोनालीला खऱ्या अर्थानं सुकून मिळाला आहे.
तिच्या चाहत्यांनाही याचा अनुभव घेता यावा यासाठी तीनं आवर्जुन हे फोटो शेअर केले आहेत.
चित्रपटांमध्ये दिसणारी सोनाली अन् हिमालयात दिसणारी सोनाली यात फरक जाणवतो.
भारताचा मुकूटमणी असलेलं काश्मीर आणि लडाख ही निसर्गानं जगाला दिलेली अनमोल देणगी आहे.
सोनालीनं 'सुकून है' या अचूक शब्दांत याचं वर्णन केलं आहे.
आता खरंतर तुम्ही देखील लडाखला भेट द्यायला हरकत नाही.
सोनालीचं हे स्टायलिश फोटोशूट पाहून तुम्हालाही लडाखमध्ये फोटोशूट करायचा मोह आवरणार नाही.