प्रणाली मोरे
सोनाली कुलकर्णीनं नुकतेच भरजरी पैठणी साडी नेसलेले फोटो शेअर केले आहेत.
ट्रेडिशनल लूकमधील सोनालीच्या या फोटोंनी सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे.
सोनालीनं फोटो पोस्ट करत कॅप्शन दिलं आहे की, नवरी नटली..
लग्न म्हटलं की आठवणींचा खजिना. आणि ह्या आठवणी सुंदर बनवण्यासाठी सोनाली पैठणी घेऊन येत आहे नवीन “लग्न कलेक्शन” !
सोनालीनं कुठल्याशा स्टोअरचं प्रमोशन करण्यासाठी हा सुंदर साज केलेला दिसत आहे.
सोनालीच्या या साडीतील फोटोंवर चाहत्यांच्या भन्नाट प्रतिक्रिया पहायला मिळत आहेत.
एका चाहत्यानं लिहिलं आहे. 'बायको मागे आहे त्यामुळे एकाच शब्दात लिहितो,सुंदर..'
'सोनाली पैठणी'चं हे कलेक्शन सध्या सोनाली कुलकर्णीला पाहिल्यावर भलतंच चर्चेत आलं आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.