Payal Naik
लोकप्रिय अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हिने आरपार या युट्यूब चॅनेलच्या मुलाखतीत तिच्या आईच्या हळदी कुंकू समारंभांबद्दल एक अनोखी गोष्ट सांगितली आहे.
हळदीकुंकवाचा महिलांच्या लग्नाशी काहीही संबंध नाही, असं सोनाली म्हणाली
ती म्हणाली, 'माझ्या आईने कायम हळदीकुंकूला तिच्या लग्न न झालेल्या आणि नवरा नसलेल्या(विधवा) मैत्रिणींनाही बोलवलं आहे
कारण, हळदीकुंकूचं उद्दिष्टच मुळात मैत्रिणींनो भेटुया, असं आहे. नटूनथटून सौभाग्यवतींनी हळदीकुंकूला यावं, या उद्दिष्टाने मी पण हळदीकुंकू करत नाही
मला तुला गजरा देवू दे, ओटी भरायला मिळू दे..हळदीकुंकू लावायला मिळू दे...मी हळदीकुंकू लावते. मला खूप छान वाटतं.
यात धर्म, जात, मॅरिटल स्टेटस याचा संबंध नाहीये. पण ती कृती किती छान आहे. मला हळदीकुंकू लावणारे कितीतरी चेहरे माझ्या लक्षात आहेत.
मी लावताना त्यांचे पाहिलेले चेहरे...कुणाच्या तरी डोळ्यांत आईने हळदीकुंकू लावल्याची आठवण असते. या किती अबोल गोष्टी आहेत".
सोनालीने 'देऊळ', 'गुलाबजाम', 'अगं बाई अरेच्चा २', 'गारभीचा पाऊस', 'गुलमोहर' अशा अनेक सिनेमांमध्ये काम केलं आहे.