Anuradha Vipat
‘सरफरोश’या चित्रपटाचा आजही चाहतावर्ग आहे
नुकतीच या चित्रपटाला २५ वर्षे पूर्ण झाली.
हा चित्रपट अभिनेत्री सोनाली बेंद्रेच्या आयुष्यातील एक महत्त्वाचा टप्पा ठरला होता.
आता यावर सोनालीने एका मुलाखतीदरम्यान वक्तव्य केले आहे.
सोनालीने म्हटले की, मला वाटते एक किंवा दोन महिन्यांपूर्वी आम्ही ‘सरफरोश’ चित्रपटाला २५ वर्षे पूर्ण झाल्याबद्दल आनंद साजरा केला.
पुढे सोनाली म्हणाली, जेव्हा मी २५ वर्षांपूर्वी चित्रपट केला तेव्हा कोणाला माहीत होते की इथे बसून आपण ‘सरफरोश’बद्दल बोलणार आहे.
पुढे बोलताना तिने म्हटले आहे की, सरफरोश चित्रपटाला २५ वर्षे पूर्ण झाल्यानंतर अचानक मला म्हातारे झाल्यासारखे वाटू लागले आहे. कारण सगळे मला विचारत होते तुम्ही हे कसे करून दाखवले.