Anuradha Vipat
बॉलीवूड अभिनेत्री सोनाली बेंद्रे सध्या चर्चेत आहे.
आता नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत सोनालीने ‘इंग्लिश बाबू देसी मेम’चं चित्रीकरण करताना तिला डान्स स्टेप शिकणं किती अवघड गेलं याबद्दल सांगितलं आहे
सोनाली म्हणाली, “मी प्रशिक्षित नृत्यांगना नाही. मी प्रशिक्षित अभिनेत्रीदेखील नाही. मी कधीही थिएटर केले नाही.
पुढे सोनाली म्हणाली, गाणी, गाण्याचं शूटिंग हे माझ्यासाठी खूप नवीन होतं. शूटिंगदरम्यान मी कितीतरी रात्र जागून काढल्या. मी तेव्हा ज्या तणावातून जात होते त्यामुळे मला नेहमी पित्त व्हायचं. मला नेहमीच गाण्यांची भीती वाटे.
तुम्ही कल्पना तरी करू शकता का की माझी कारकीर्द या गाण्यांवरच आधारित आहे ज्याची मला भीती वाटायची असंही पुढे सोनाली म्हणाली
सगळ्याच गाण्यांमध्ये काय मला डान्स करायचा नव्हता. ‘संभाला है मैने’ हे माझं पहिलं गाण होत ज्यात फक्त मला हावभाव दाखवायचे होते आणि चालायचं होतं अंसही पुढे सोनाली म्हणाली
सोनाली पुढे म्हणाली, “इंग्लिश बाबू देसी मेम या चित्रपटात सरोज खान तर मला मारायलाच तयार होत्या कारण मी नीट डान्स करत नव्हते