Anuradha Vipat
अभिनेत्री सोनाली कुलकर्णी स्वतःच्या नावामुळे त्रस्त झाली आहे
मराठी मनोरंजन विश्वात एकाच नावाच्या दोन गाजलेल्या अभिनेत्री आहेत.
एकसारखंच नाव असल्याने अनेकदा गोंधळ होतो, असं अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने तिच्या नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत म्हटलं आहे.
सोनाली कुलकर्णी या नावामुळे आपल्याला अनेकदा त्रास सहन करावा लागल्याचे सोनालीने म्हटले आहे.
सोनाली म्हणाली की, ‘इतकी वर्ष मनोरंजन विश्वात काम करूनही मला समोरच्या व्यक्तीला मी कोणती सोनाली कुलकर्णी आहे, हे सांगावं लागतं.
पुढे सोनाली म्हणाली की, अनेकदा वेगळ्या कार्यक्रमांचे फोन मला येतात, जे दुसऱ्या सोनालीसाठी असतात.
या संदर्भात मी सोनालीशी देखील बोलले आहे. यावर काही तरी पर्याय शोधायला हवा असंही सोनाली म्हणाली आहे