Monika Lonkar –Kumbhar
बॉलिवूड अभिनेत्री सोनम कपूरने या ब्लॅक गाऊनमध्ये स्टनिंग अंदाजात अंबानींच्या प्री-वेडिंग फंक्शनला नुकतीच हजेरी लावली होती.
अंबानींच्या प्री-वेडिंग फंक्शनला ब्लॅक अंदाजात लक्ष वेधून घेतल्यानंतर दुसऱ्या दिवशी सोनमने या ऑफ व्हाईट लेहेंग्यात चाहत्यांचे मन जिंकून घेतले आहे. तिने हे फोटो नुकतेच इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.
फॅशन जगतातील प्रसिद्ध डिझायनर अनामिका खन्नाने हा सोनमचा सुंदर लेहेंगा डिझाईन केला आहे.
या व्हाईट लेहेंग्यावर सोनमने सिल्वर रंगाची कमाल ज्वेलरी कॅरी केली असून सोनम यात खूपच सुंदर दिसतेय.
या लेहेंग्यावर सोनमने स्मोकी आयमेकअप आणि ग्लॉसी लिप्सचा सुंदर मेकअप केला आहे.
सोनमने कॅरी केलेली ही सिल्वर ज्वेलरी आणि मिनिमल मेकअप चाहत्यांच्या पसंतीस उतरला आहे.
तिच्या या सुंदर फोटोंवर चाहत्यांनी लाईक आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.