Pranali Kodre
टी20 वर्ल्ड कप 2024 स्पर्धेच्या उपांत्य फेरीत दक्षिण आफ्रिकेने अफगाणिस्तानला 9 विकेट्सने पराभूत केलं आणि अंतिम फेरीत धडक मारली.
दक्षिण आफ्रिकेने वनडे किंवा टी20 प्रकारातील वर्ल्ड कपच्या अंतिम सामन्यात पोहचण्याची ही पहिलीच वेळ आहे.
दक्षिण आफ्रिकेला यापूर्वी वनडे आणि टी20 वर्ल्ड कपमध्ये मिळून 7 वेळा उपांत्य सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला आहे. या 7 उपांत्य सामन्यातील निकालांवर एक नजर टाकू.
1992 वनडे वर्ल्डकपच्या उपांत्य सामन्या इंग्लंडविरुद्ध १९ धावांनी पराभूत दक्षिण आफ्रिका पराभूत झाले होते.
1999 वनडे वर्ल्डकपच्या उपांत्य सामन्यात ऑस्ट्रेलियाविरुद्ध बरोबरी झाली होती. पण ऑस्ट्रेलियाने ग्रुप स्टेजमध्ये वरचे स्थान मिळवल्याने दक्षिण आफ्रिकेचे आव्हान संपले.
2007 वनडे वर्ल्डकपच्या उपांत्य सामन्यात ऑस्ट्रेलियाविरुद्ध 7 विकेट्सने दक्षिण आफ्रिकेला पराभव स्विकारावा लागला होता.
2009 टी20 वर्ल्डकपच्या उपांत्य सामन्यात पाकिस्तानविरुद्ध दक्षिण आफ्रिका 7 धावांनी पराभूत झाले होते.
2014 टी20 वर्ल्डकपच्या उपांत्य सामन्यात दक्षिण आफ्रिकेला भारताविरुद्ध 6 विकेट्सने पराभूत व्हावं लागलं होतं.
2015 वनडे वर्ल्डकपच्या उपांत्य सामन्यात दक्षिण आफ्रिकेला न्यूझीलंडविरुद्ध 4 विकेट्सने पराभूत व्हावं लागलं होतं.
2023 वनडे वर्ल्डकपच्या उपांत्य सामन्यात दक्षिण आफ्रिकेला ऑस्ट्रेलियाविरुद्ध 3 विकेट्सने पराभूत व्हावं लागलं होतं.
अखेर 7 वेळा उपांत्य सामन्यात पराभवाचा सामना करावा लागल्यानंतर दक्षिण आफ्रिकेने 2024 टी20 वर्ल्डकपच्या अंतिम सामन्यात प्रवेश केला.