सकाळ डिजिटल टीम
दक्षिण भारतीय चित्रपटसृष्टीतील सुंदर अभिनेत्री महालक्ष्मीचे (Actress Mahalakshmi) लग्न दक्षिण चित्रपट निर्माता रविंदर चंद्रशेखरन यांच्याशी झालेय. लग्नानंतर अभिनेत्री आपलं आयुष्य आनंदानं जगत आहे.
लग्नानंतर, जेव्हा-जेव्हा अभिनेत्री तिच्या पतीसोबतचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट करते, तेव्हा काही लोक त्यांच्या लग्नाची खिल्ली उडवत असतात.
चित्रपट निर्माते रविंदर चंद्रशेखरन (Filmmaker Ravindar Chandrasekaran) यांचा लठ्ठपणा आणि त्वचेचा रंग पाहून लोक या जोडीला ट्रोल करताना दिसते.
2000 साली एका म्युझिक चॅनलवर होस्ट म्हणून आपल्या करिअरची सुरुवात करणारी अभिनेत्री महालक्ष्मीने पहिलं लग्न अनिल नेरेडिमिली यांच्याशी केलं.
मात्र, या लग्नानंतर तिचे पतीसोबत वाद होऊ लागले आणि दोघांनी वेगळे होण्याचा निर्णय घेतला.
या अभिनेत्रीने तिच्या करिअरमध्ये अनेक मालिका आणि चित्रपटांमध्ये काम केले आहे.
जेव्हा या अभिनेत्रीनं रविंदर चंद्रशेखरनसोबत दुसरं लग्न केलं, तेव्हा तिला मोठ्या प्रमाणात ट्रोल करण्यात आलं.