सकाळ डिजिटल टीम
साहित्य :
1 कप तूर डाळ, 2 मध्यम आकाराचे टोमॅटो, मोठा कांदा, 3 मध्यम आकाराच्या शेवग्याच्या शेंगा, 5-6 भेंडी, 6-7 कढीपत्ता आणि चिंचेचा
कोळ. एक ग्लास पाणी.
मसाले
हिंग, मोहरी, लाल तिखट, 2 सुक्या लाल मिरच्या, हळद आणि मीठ, शेंगदाणाचे तेल किंवा मोहरी तेल असल्यास चांगलं.
कृती :
तूर डाळ साधारण 2 तास भिजत ठेवा. चिंच पाण्यात भिजत ठेवावी जेणेकरून त्याच्या बिया सहज वेगळे करता येतील आणि लगदा काढता येईल.
टोमॅटो कांदे, शेवग्याच्या शेंगा चिरून घ्या.
प्रेशर कुकरमध्ये एक चमचा तेल टाका. गरम झाल्यावर त्यात हिंग आणि नंतर मोहरी टाका. त्यात कढीपत्ता आणि लाल मिरच्या टाका, नंतर सर्व भाज्या घाला. त्यांना एक मिनिट शिजू द्या.
भाजीमध्ये चिंचेचा कोळ घाला आणि नंतर अर्धा मिनिट शिजवल्यानंतर त्यात डाळ घाला. आता त्यात सर्व सुके मसाले घाला.
शेवटी एक ग्लास पाणी टाका आणि कुकरचे झाकण बंद करा. 7 शिट्ट्या झाल्यावर गॅस बंद करा.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.