Spam Call : स्मार्टफोनमध्ये करा ही सेटिंग अन् मिळवा सुटका

सकाळ डिजिटल टीम

स्पॅम कॉल हे अनेक लोकांसाठी डोकेदुखी ठरत आहे.

एका अहवालात स्पॅम कॉल्सची संख्या वाढल्याचा दावा करण्यात आला आहे.

अनेक मोबाईल वापरकर्ते स्पॅम कॉलमुळे त्रस्त आहेत. ते टाळण्यासाठी मार्ग शोधत आहेत.

स्मार्टफोनच्या सेटिंग्जमध्ये किरकोळ बदल करून तुम्ही स्पॅम कॉल्स सहजपणे ब्लॉक करू शकता.

अशा परिस्थितीत कोणीतरी तुम्हाला स्पॅम नंबरवरून कॉल केला तर मोबाईल असे नंबर आपोआप ब्लॉक करेल.

सर्वप्रथम स्मार्टफोनच्या डायल पॅडवर जावे लागेल. येथे तुम्हाला कॉल सेटिंगचा पर्याय मिळेल.

यानंतर तुम्हाला कॉलर आयडीच्या पर्यायावर जावे लागेल.

तुम्ही स्पॅम आयडी पर्याय चालू करा आणि स्पॅम कॉल फिल्टर सुरू करा.

असे केल्यास बहुतेक स्पॅम कॉल ब्लॉक केले जातील.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.