Anuradha Vipat
ऑलिम्पिक स्पर्धेच्या फायनलमध्ये कुस्तीगीर विनेश फोगट अपात्र ठरली आहे
आता अभिनेते धर्मेंद्र यांनी विनेशसाठी पोस्ट लिहिली आहे.
धर्मेंद्र यांनी लिहिलं आहे की, ‘डार्लिंग कन्या विनेश, तुझ्याबद्दलची बातमी ऐकून आम्ही खूप दु:खी आहोत. तू या मातीतील शूर साहसी कन्या आहेस.
पुढे धर्मेंद्र यांनी लिहिलं आहे की, आमचं तुझ्यावर खूप प्रेम आहे आणि तुझ्या आरोग्यासाठी, आनंदासाठी आम्ही नेहमी प्रार्थना करतो.
तुझ्या कुटुंबासाठी आणि जवळच्या प्रिय व्यक्तींसाठी तू नेहमी खुश आणि निरोगी राहा असं धर्मेंद्र यांनी लिहिल आहे.
50 किलो वजनी गटात खेळणाऱ्या विनेशला अंतिम फेरीच्या दिवशी वजन अधिक भरल्याने पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेतून थेट अपात्र ठरवण्यात आलं होतं
या धक्कादायक घटनेनंतर देशभरातील तिच्या लाखो चाहत्यांनी हळहळ व्यक्त केली