Anuradha Vipat
घराघरांत लोकप्रिय झालेला अभिनेता म्हणून जितेंद्र जोशीला ओळखलं जातं.
अनुराग कश्यपच्या ‘सेक्रेड गेम्स’मध्ये जितेंद्रने खूप प्रभावी पात्र साकारलं होतं.
आता त्याने सोशल मीडियावर अनुरागसाठी एक खास पोस्ट शेअर करत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
या पोस्टसह जितेंद्रने दिग्दर्शकाबरोबरचा एका सेल्फी सुद्दा शेअर केला आहे .
जितेंद्र जोशीने पोस्टमध्ये लिहिल आहे की, “एक काळ असा होता जेव्हा मला बकेट लिस्ट म्हणजे काय? हे माहिती नव्हतं. पण अनुराग कश्यप यांच्याबरोबर काम करायचं. त्यांना मी जवळपास २२ वर्षांपासून बघत आलोय…आमची एकमेकांबरोबर ओळखही होती.
पुढे जितेंद्र जोशीने पोस्टमध्ये लिहिल आहे परंतु कधीच “सर, तुमच्याबरोबर काम करायचंय” असं सांगण्यासाठी माझं धाडस झालं नाही. पण, कुठे ना कुठे मनात एक गोष्ट जाणवत होती की एक दिवस नक्की येणार आणि मी त्यांच्याबरोबर काम करणार
“भूमिका लहानशी होती आणि ३ दिवसांचं शूटिंग होतं. पण, त्या २२ वर्षांचा विचार केला तर कसालाच हिशोब पूर्ण होणार नाही. आणि अखेर ते स्वप्न साकार झाल. माझं तुमच्यावर खूप प्रेम आहे. तुम्ही नक्की काय आहात हे तुम्हाला कधीच कळू नये अशी माझी इच्छा आहे.” अशी पोस्ट जितेंद्र जोशीने अनुराग कश्यपसाठी शेअर केली आहे.