Anuradha Vipat
अभिनेत्री रवीना टंडन खासगी आयुष्यामुळे कायम चर्चेत असते.
रवीनाने इन्स्टाग्रामवर काही फोटो पोस्ट केले आहेत.
या फोटोंमध्ये रवीना तिच्या चार मुलांसोबत दिसत आहे.
सध्या रवीनाने पोस्ट केलेले फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.
पोस्टमध्ये रवीना म्हणाली आहे की, वेळ किती वेगाने जातो, मुलं मोठी होतात आणि एक दिवस त्यांना सोडण्याची वेळ येते.
पुढे रवीना म्हणाली आहे की, प्रत्येक आईसाठी मुलांना सोडण्याची वेळ वाईट असते. कारण मुलांमध्ये आईचं पूर्ण जग असतं
मुलांना उडण्यासाठी पंख द्या, त्यांना कायम भरारी घेत राहू द्या असं देखील रवीना म्हणाली आहे.