सकाळ डिजिटल टीम
Spring Season Kolhapur : वसंतोत्सव म्हणजे खरेतर निसर्गाचा उत्सव. मानवी जीवनातही तारुण्य हा वसंत ऋतूच असतो.
वसंत ही निसर्गाची युवावस्था आहे. ईश्वराचा जेव्हा स्पर्श होतो, तेव्हा आयुष्यात फक्त एकच ऋतू येतो, तो म्हणजे वसंत ऋतू.
अशा या वसंतात चराचर सृष्टी नव्या पालवीने, नव्या उन्मादाने बहरून येते.
शिशिराची पानगळ झाल्यानंतर भकास झालेल्या सृष्टीत वसंत चैतन्याचा झरा घेऊन येतो.
हे चैतन्य चराचर सृष्टीतील लता, वेली, फुले, झाडांमध्ये दिसून येते. कोकिळेचा स्वर आसमंतात घुमू लागतो. पक्ष्यांचे कूंजन सुरू होते.
पावसाचा थेंब नसतानाही सृष्टीला नवपालवी फुटण्याची परमेश्वरी किमया वसंतात साकार होते. लक्षात येतंय ना...! वसंत बहरू लागला आहे. (बी. डी. चेचर : सकाळ छायावृत्तसेवा)