Pranali Kodre
भारतीय क्रिकेट संघाचा झिम्बाब्वे दौऱ्यात झालेल्या टी२० मालिकेत भारताने ४-१ असा विजय मिळवला.
या दौऱ्यापूर्वीच विराट कोहली, रोहित शर्मा आणि रविंद्र जडेजा यांनी आंतरराष्ट्रीय टी२० क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे, त्यामुळे ते या दौऱ्याचा भाग नव्हते, तर जसप्रीत बुमराहसह बाकी अनुभवी खेळाडूंना विश्रांती देण्यात आली होती.
आता या दौऱ्यानंतर जुलैच्या अखेरीस भारतीय संघाला श्रीलंका दौऱ्यावर जायचे आहे. या दौऱ्यात ३ टी२० आणि ३ वनडे सामने खेळायचे आहेत.
श्रीलंका दौऱ्यासाठीही वरिष्ठ खेळाडूंना विश्रांती दिली जाण्याची शक्यता आहे, अशी चर्चा होती.
मात्र, संघाचा नवनियुक्त प्रशिक्षक गौतम गंभीरने म्हटलं होतं की सर्व खेळाडूंनी तिन्ही प्रकारांसाठी उपलब्ध असायला हवे.
अशात आता असं समजत आहे की रोहित कदाचीत श्रीलंकेविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी उपलब्ध असू शकतो. तो लवकरच बीसीसीआयला याबाबत स्पष्ट माहिती देण्याची शक्यता आहे.
जर रोहित वनडे मालिकेसाठी उपलब्ध असेल, तर तोच वनडे मालिकेत भारतीय संघाचं नेतृत्व करेल, हे स्पष्ट आहे.
तसेच बुमराह आणि विराट हे मात्र उपलब्ध राहण्याची शक्यता कमी आहे. त्यांना श्रीलंका दौऱ्यासाठी विश्रांती मंजूर करण्यात आली आहे.
याशिवाय भारतीय संघात श्रेयस अय्यर आणि केएल राहुल यांचेही पुनरागमन होण्याची शक्यता आहे.
इतकंच नाही, तर जर रोहितही वनडे मालिकेसाठी उपलब्ध नसेल, तर श्रेयस आणि केएल हे दोघेही नेतृत्वपदासाठी प्रबळ दावेदार आहेत.
भारताला श्रीलंका दौऱ्यात २७ जुलैपासून ३० जुलैपर्यंत टी२० मालिका खेळायची आहे, तर २ ऑगस्ट ते ७ ऑगस्टपर्यंत वनडे मालिका खेळायची आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.