Aishwarya Musale
जेवण चविष्ट बनवण्यासाठी घरामध्ये वेलची, तमालपत्र, काळी मिरी, लवंग, चक्रफूल इत्यादी विविध मसाल्यांचा वापर केला जातो.
जेवणात वापरले जाणारे मसाले आरोग्यास उपयुक्त ठरतात.
खड्या मसाल्यांमध्ये आपण जेवणात चक्रफूल वापरतो. चक्रफूलात अनेक प्रकारचे पोषक घटक आढळतात. चक्रफूलामध्ये व्हिटॅमिन सी, अँटीऑक्सिडंट, अँटीबॅक्टेरियल यांसारखे पोषक घटक आढळतात, जे आरोग्यास फायदेशीर ठरतात.
चक्रफूलात अँटिऑक्सिडंट गुणधर्म आढळतात. चक्रफूल पचनासाठी उत्तम मानले जाते.
चक्रफूलातील पोषक घटक शरीरातील सर्व घाण काढून टाकण्यास मदत करतात, ज्यामुळे कोलेस्ट्रॉलही नियंत्रणात राहते.
अॅसिडिटीचा त्रास होत असेलेल्या लोकांनी चक्रफूलाचे सेवन करावे.
चक्रफूलात आढळणारे घटक अॅसिडिटी आणि बद्धकोष्ठता यांसारख्या समस्या दूर करतात.
चक्रफूलात व्हिटॅमिन सी जास्त प्रमाणात आढळते, त्यामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढते. चक्रफूल वजन कमी करण्यास प्रभावी ठरते.