सकाळ डिजिटल टीम
सहा महिन्यांच्या अथक प्रयत्नानंतर अवकाशातील ताऱ्याला साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांचं नाव मिळालंय.
यंदा अण्णाभाऊ साठे यांची 104 वी जयंती अनोख्या पद्धतीने साजरी केली जाणारा आहे.
छत्रपती संभाजीनगरमधील उद्योजक सुशील तुपे यांनी या ताऱ्याचं रजिस्ट्रेशन केलंय.
तुपे यांनी इंटरनॅशनल स्टार अँड स्पेस रजिस्ट्री या संस्थेकडे सर्व कागदपत्रांची माहिती पुरवली. त्यानंतर महिनाभरापूर्वी ताऱ्याचं रजिस्ट्रेशन पूर्ण झालं.
अण्णाभाऊ साठे कोण होते, त्यांचं कार्य किती महान होतं, या उद्देशानं ताऱ्याचं रजिस्ट्रेशन करण्यात आलं आहे.
1 ऑगस्ट रोजी हा तारा प्रत्येकाला बघता येणार आहे. यासाठी मोबाईल प्ले स्टोअरमध्ये जाऊन स्पेस रजिस्ट्री किंवा स्टार नेमिंग ॲप्लिकेशन डाउनलोड करा.
त्यानंतर त्या ॲप्लिकेशनमध्ये रजिस्ट्री ताऱ्याचा नंबर WVP773557 टाकून तुम्ही तो बघू शकता.
तसेच ‘द इनोव्हेटिव्ह युजर स्टार फाइंडर थ्रीडी स्मार्टफोन ॲप अँड्रॉइड अँड आयओएस वरून देखील हा तारा बघता येईल,’ अशी माहिती सुशील तुपे यांनी दिली.