Amit Ujagare (अमित उजागरे)
1) आरसीसीच्या बांधकामासाठी आपण स्टील हा शब्द अनेकदा ऐकला असेल. तसंच घरातील भांड्यांसाठी स्टेनलेस स्टील हा शब्दही ऐकला असेल.
2) पण स्टील आणि स्टेनलेस स्टील या दोन्हींमध्ये नेमका काय फरका आहे? हे आपण जाणून घेणार आहोत.
3) स्टील हे स्टेनलेस स्टीलपेक्षा अधिक भक्कम आणि मजबूत असते. त्यामुळं ते इमारतींच्या बांधकामात वापरलं जातं.
4) स्टीलमध्ये लोखंड आणि कर्बन असतं, त्यामुळं ते खूपच मजबूत असतं. पण कार्बन असल्यानं पाण्याच्या संपर्कात किंवा आद्रतेच्या संपर्कात आल्यास त्याला गंज चढतो. हा गंज हळूहळू स्टीलला कमजोर करतो.
5) तर स्टेनलेस स्टीलमध्ये क्रोमिअम, व्हाईट स्टील आणि थोड्या प्रमाणात लोखंड आणि कार्बन असतं. या धातुंच्या मिश्रणामुळं स्टेनलेस स्टीलला गंज चढत नाही.
6) स्टीलमध्ये मोठ्या प्रमाणावर लोखंड असल्यानं त्यात चुंबकीय तत्व असतं. तर स्टेनलेस स्टीलमध्ये लोखंडाच प्रमाण कमी असल्यानं यात चुंबकीय तत्व नसतं.
7) स्टीलचं आवरण हे ओबडधोबड असल्यानं तसंच त्याला गंज चढत असल्यानं त्याला वारंवार कोटिंग करावं लागतं.
8) पण स्टेनलेस स्टीलचं बाह्य आवरण चमकदार आणि गंजविरहित असल्यानं ते स्वच्छ करण्यास सोपं आणि घरगुती भांड्यांच्या वापरासाठी योग्य आहे.
9) स्टील हे स्टेनलेस स्टीलच्या तुलनेत स्वस्तः आणि परवडणार असतं. तर स्टेनलेस स्टीलवर अनेक प्रक्रिया कराव्या लागत असल्यानं ते तुलनेत महाग असतं.
10) सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे जर मालवण इथल्या शिवाजी महाराजांच्या पुतळ्यात स्टेनलेस स्टील वापरलं असतं तर गंजण्यामुळं पुतळ्याला धोका कमी झाला असता. पण तरीही चांगल्या ग्रेडच्या स्टील इतकी मजबुती त्याला मिळू शकत नाही.