Pranali Kodre
ऑस्ट्रेलिया क्रिकेटमध्ये अनेक दिग्गज खेळाडू होऊन गेले आहेत. यामध्ये स्टीव्ह आणि मार्क या जुळ्या वॉ भावांचाही समावेश आहे.
2 जून 1965 साली सिडनीमध्ये जन्मलेल्या स्टीव आणि मार्क यांनी अनेकवर्षे क्रिकेटचे मैदान गाजवले.
26 डिसेंबर 1985 साली भारताविरुद्ध कसोटीतून स्टीव्ह यांचे ऑस्ट्रेलियासाठी पदार्पण झाले, तर मार्क यांचे तीन वर्षांनी 11 डिसेंबर 1988 साली पाकिस्तानविरुद्ध वनडे सामन्यातून ऑस्ट्रेलियासाठी पदार्पण झाले होते.
मार्क यांचे कसोटी पदार्पण 1991 मध्ये स्टीव्ह यांच्या जागेवर झाले होते. स्टीव्ह यांना संघातून वगळ्यानंतर त्याच्या जागेवर मार्क यांची निवड झाली होती. त्यामुळे वॉ कुटुंबात आनंद आणि निराशा अशा दोन्ही भावना एकाचवेळी होत्या.
दरम्यान, स्टीव्ह आणि मार्क हे दोघे ऑस्ट्रेलियासाठी तब्बल 108 कसोटी सामने आणि 214 वनडे सामने एकत्र खेळले. ते ऑस्ट्रेलियासाठी कसोटीत एकत्र खेळणारे पहिले जुळे भाऊ देखील आहेत.
स्टीव वॉ हे ऑस्ट्रेलियाचे दिग्गज कर्णधारही झाले, त्यांच्या नेतृत्वात 1999 मध्ये ऑस्ट्रेलियाने वनडे वर्ल्ड कपही जिंकला.
स्टीव वॉ यांनी 168 कसोटीत 10927 धावा आणि 92 विकेट्स घेतल्या, तर 325 वनडेत 7569 धााव केल्या आणि 195 विकेट्स घेतल्या.
मार्क वॉ यांनी 128 कसोटीत 8029 धावा केल्या आणि 59 विकेट्स घेतल्या. तसेच 244 वनडेत 8500 धावा केल्या, तर 85 विकेट्स घेतल्या.