धनश्री भावसार-बगाडे
अॅप्पल कंपनीचे संस्थापक स्टीव्ह जॉब्ज यांच्या यशाबद्दल जगाला कौतुक आहे. त्यांच्याकडूनच जाणून घेऊया यशस्वी होण्याचा कानमंत्र.
जर तुम्ही नीट बघितलं तर कोणालाही एका रात्रीत यश मिळत नाही. त्यासाठी वेळ लागतोच आणि क्षमताही वाढवाव्या लागतात.
यशस्वी होण्यासाठी क्वांटिटीवर नाही तर क्वालिटीवर भर द्याला हवा.
वेळ फारच मर्यादित आहे. त्यामुळे इतरांवर वेळ घालवून त्यांच्यानुसार जगणं बंद करा.
जर तुम्ही तुमचे सर्वोत्तम प्रयत्न करून अपयशी ठरलात तर हरकत नाही, कमीत कमी प्रयत्न तर केले ना.
तुमचं मन, हृदय काय सांगतं, इंट्युएशन्स यावर लक्ष द्या. तुम्हाला काय बनायचं आहे हे त्यांना जास्त समजतं.
बऱ्याचदा आयुष्यात तुम्ही ठेचकळाल. तोंडावर पडाल पण श्रद्धा ढळू देऊ नका.
मी योग्य आहे की नाही, याची मी पर्वा करत नाही. मला फक्त यशाची आणि योग्य गोष्टी करण्याची पर्वा आहे.
अपयश आलं तर त्यातून शिका. चुकांमधून शिका, मागे हटू नका.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.