Pranali Kodre
ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत संघात २२ नोव्हेंबरपासून ५ कसोटी सामन्यांची बॉर्डर-गावसकर ट्रॉफी सुरू होणार आहे.
या कसोटी मालिकेदरम्यान ऑस्ट्रेलियाचा स्टार खेळाडू स्टीव्ह स्मिथला मोठा विक्रम करण्याची संधी असणार आहे.
स्मिथने जर या मालिकेत ३१५ धावा केल्या, तर तो कसोटीमध्ये १० हजार धावांचा टप्पा गाठेल.
तसेच स्मिथ १० हजार कसोटी धावा करणारा जगातील १५ वा, तर ऑस्ट्रेलियाचा चौथा खेळाडू ठरेल.
ऑस्ट्रेलियाकडून कसोटीत रिकी पाँटिंग (१३३७८), ऍलेन बॉर्डर (१११७४) आणि स्टीव्ह वॉ (१०९२७) यांनीच १० हजारांहून अधिक धावा केल्या आहेत.
सध्या स्मिथच्या कसोटीमध्ये १०९ सामन्यांमध्ये ५६.९७ च्या सरासरीने ९६८५ धावा आहेत.
स्मिथने कसोटीमध्ये आत्तापर्यंत १०९ सामन्यांमध्ये ३२ शतके आणि ४१ अर्धशतके केली आहेत.
स्मिथने भारताविरुद्ध आत्तापर्यंत १९ कसोटी सामने खेळले असून ६५.८७ च्या सरासरीने २०४२ धावा केल्या आहेत, यामध्ये ९ शतके आणि ५ अर्धशतकांचा समावेश आहे.