रोहित कणसे
आपल्या पैकी अनेकांना दररोज सकाळी साउथ इंडियन पदार्थांसोबत सांबर खाण्याची सवय असेल.
दक्षिण भारतातील हे प्रसिद्ध व्यंजन सांबर संपूर्ण भारतात प्रसिद्ध आहे, दाळी आणि अनेक भाज्या घालून तयार केलेला हा पदार्थ आता जगभर खाल्ला जातो.
पण या सांबर नावाची उत्पत्ती नेमकी कुठे झाली? या पदार्थाचा नेमका इतिहास काय आहे? याबद्दल आपण एक खास गोष्ट आपण जाणून घेणार आहोत.
आपल्याला सांबर म्हटलं की इडली-वड्यासोबत खातो ती रस्सा भाजी एवढंच माहितेय, पण बीबीसीच्या रिपोर्टनुसार सांबर शब्दाचा अर्थ हा 'स्वाद वाढवणारा' असा होतो.
सांबरच्या निर्मीतीचा एक किस्सा खूप प्रसिद्ध आहे, त्यानुसार तंजावुर येथील मराठा शासकांच्या स्वयंपाकघरात अगदी योगायोगाने सांबर तयार झाले होते असे सांगितले जाते.
छत्रपती शिवाजी महाराज यांचे सावत्र भाऊ व्यंकोजी हे तंजावुर वर राज्य करत होते, त्यांच्यानंतर पाककलेची आवड असलेले त्यांचे पुत्र शाहूजी हे या राज्याचे शासक बनले.
दरम्यान सर्रास सांगितल्या जाणाऱ्या या कथेनुसार जेव्हा छत्रपती संभाजी महाराज हे तंजावुरच्या दौऱ्यावर गेले होते तेव्हा शाहूजी महाराजांच्या शाही स्वयंपाक घरात कोकम उपलब्ध नव्हते.
यावेळी शाहूजी महाराज यांना कोकमच्या एवजी शाहू महाराजांना भाजीत चिंचेचा वापर करण्याचा सल्ला देण्यात आला.
शाहू महाराजांनी त्या दिवशीच्या भाजीत चिंच टाकून ती शिजवली, जी पुढे चांगलीच प्रसिद्ध झाली.
संभाजी महाराजांसाठी बनवण्यात आलेल्या या पदार्थाला त्यांच्या सन्मानार्थ 'संभाजी आहार' असं नाव देण्यात आलं, जे पुढे चालून सांबर बनलं.
सांबरच्या उत्पत्तीबद्दल साधारणपणे सगळीकडं हीच गोष्ट सांगितली जाते, पण काही संशोधक या कथेत फारसे तथ्य नसल्याचे सांगतात.
लाडक्या गणपती बाप्पाकडून या 5 गोष्टी आहेत शिकण्यासारख्या