ऋषिकेश साळवी (Rushikesh Salvi)
जगातील श्रीमंत देवस्थान आणि लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या तिरुपती बालाजी मंदिराच्या लाडू प्रसादाबद्दल सध्या वाद निर्माण झाला आहे.
तिरुपतीला दर्शन केल्यानंतर भाविक लाडू आवर्जून आणतात. घरी आल्यावर हा प्रसाद वाटला जातो. चला तर या प्रसादाचा इतिहास जाणून घेऊया.
१७१५ पासून तिरुपती बालाजीला लाडू हा प्रसाद दाखविण्यास सुरूवात केली.
२०१४ मध्ये भौगोलिक मानांकन (जीआय) प्राप्त झाले.
‘जीआय’मुळे केवळ तिरुपती-तिरुमला देवस्थानला लाडू बनविण्याचा आणि त्याच्या वितरणाचा अधिकार मिळाला.
मंदिराच्या स्वयंपाकगृहात लाडू तयार केले जातात. या जागेला ‘पोटू’ म्हणतात ‘पोटू’त स्वच्छतेकडे काटेकोरपणे लक्ष दिले जाते.
प्रत्येक आचाऱ्याच्या चमूने बनविलेला पहिला लाडू बालाजीला नैवेद्य म्हणून दाखविला जातो.
नैवेद्य दाखविल्यानंतर प्रसादाच्या रूपात भाविकांना वाटप सुरू होते.
शुद्ध तूप, खडी साखर, बेसन पीठ आणि काजू, बेदाणे, बदाम, वेलची, दूध या पदार्थांचा वापर दर्जेदार साहित्यातून वैशिष्टपूर्ण चवीचे लाडू तयार केले जातात.