सुबोध भावे बोलणार, चर्चा तर होणारच!

प्रणाली मोरे

मराठीतला स्टार अभिनेता सुबोध भावे अचानक ट्रोल होऊ लागलाय याला कारण राजकीय नेत्यांची लायकी काढणारं त्याचं वक्तव्य. यावरनं वाद रंगल्यावर त्यानं भाषण पूर्ण ऐका असं स्पष्टिकरण देत,'चुकलं असेल तर माफ करा' असं देखील म्हटलं आहे. पुण्यातील एका कार्यक्रमात त्यानं हे वक्तव्य केलेले होतं.

Esakal

२०१७ साली सुबोधनं सोशल मीडियावर अचानक एक ट्वीट केलं होतं,ज्यावरुन अभिनेत्याचं कोणाशी बिनसलं याची चर्चा रंगली होती. त्यानं लिहिलं होतं,''कोणाचाच कोणावर विश्वास राहिला नाही, तरीपण वो सुबह कभी तो आयेगी'' ,त्या ट्वीटनंतर सुबोध इंग्रजी वर्तमानपत्रांच्या हेडलाईन्समध्येही चमकला होता.

Esakal

२०२० मध्ये अचानक सुबोध भावेनं एक ट्वीट करत आपलं ट्वीटर अकाऊंट बंद करत आहोत हा निर्णय जाहिर केला होता. तेव्हा देखील एकच खळबळ माजली होती. त्यानं तेव्हा आपल्या ट्वीटमध्ये लिहिलं होतं, ''जिथे मला चांगलं वाटेल,आनंद मिळेल,माझा उत्साह वाढेल असं काहीच घडत नाही तिथे राहणं मी उचित समजत नाही''. असं म्हणत सुबोधनं ट्वीटर अकाऊंट बंद करण्याचं मोठं पाऊल उचललं होतं.

Esakal

२०१९ साली अचानक सुबोधनं संतापून जाहिर केलं होतं,''यापुढे नाटकात काम करणार नाही'' या त्याच्या वक्तव्यामुळे सारेच हडबडले होते. सुबोध सारख्या गुणी अभिनेत्यासोबत असं काय घडलं बरं? तर त्याला कारण होतं, त्याच्या एका नाट्यप्रयोगाच्या दरम्यान प्रेक्षकांचे फोन खणखणणे. आणि तेव्हाच सर्व प्रेक्षकांसमक्ष त्याने हा निर्णय जाहिर केला होता.

Esakal

२०२० साली कंगनानं मुंबईला 'पाकव्याप्त काश्मिर' म्हटलं होतं,तेव्हा संतापून सुबोधनं एक ट्वीट केलं होतं. म्हणाला होता,''बहिणी,तु ज्या शहरात राहतेस,काम करतेस,पैसे मिळवतेस त्याचा सन्मान करायला शिक, तुला जे काही राजकारण खेळायचंय ते तुझ्या गावात जाऊन खेळ''.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Esakal