सकाळ डिजिटल टीम
स्वामी विवेकानंद हे अनेकांचे अध्यात्मिक गुरू असून ते अनेकांना प्रेरित करतात. आपण आज त्यांनी दिलेले यशाचे मंत्र जाणून घेऊयात.
अनुभवांपेक्षा चांगला गुरू नाही. त्यामुळे स्वानुभवांपेक्षा चांगले तुम्हाला इतर कोणीच शिकवू शकत नाही.
तुमचे विचार तुम्हाला सु्ज्ञ बनवतात. त्यामुळे विचारांना नेहमीच प्राधान्य द्या.
उठा! जागे व्हा! आणि ध्येय प्राप्तीपर्यंत थांबू नका.
फळाची अपेक्षा न ठेवता निस्वार्थीपणे काम करत रहा, यश नक्की मिळेल.
कोणत्याही समस्येला सकारात्मक मानसिकतेने सामोरे जा. स्वत:ला आणि इतरांनाही कमी लेखू नका.
कोणतीही कल्पना केवळ मनात न ठेवता सत्यात उतरवा.
कशाचीही भीती बाळगू नका. भीती सोप्या कामालाही अवघड बनवते.
जर तुम्ही स्वत:ला कमजोर समजत तर तुम्ही कमजोर व्हाल. जर तुम्ही स्वत:ला कणखर समजलात तर कणखर बनाल.
कोणत्याही चुकीसाठी इतरांना दोष देऊ नका. त्याची जबाबदारी स्वत: घ्या.