तब्बल 16 सरकारी नोकरीच्या ऑफर्स नाकारल्या अन् पहिल्याच प्रयत्नात UPSC मध्ये झाली उत्तीर्ण!

सकाळ डिजिटल टीम

16 सरकारी नोकरीच्या ऑफर्स नाकारल्या

IPS Tripti Bhatt : आज आपण ज्या व्यक्तीबद्दल सांगत आहोत, त्यांनी UPSC परीक्षा दिली आणि एक नव्हे, तर तब्बल 16 सरकारी नोकरीच्या ऑफर्स नाकारून इतिहास रचलाय.

Success Story IPS Tripti Bhatt

सामान्य कुटुंबात जन्म

तृप्ती भट्ट या उत्तराखंडमधील एका सामान्य कुटुंबातून येतात. चार भावंडांमध्ये त्या सर्वात मोठ्या आहेत.

Success Story IPS Tripti Bhatt

अल्मोडामध्ये शालेय शिक्षण

तृप्ती भट्ट यांनी त्यांचं शालेय शिक्षण अल्मोडा येथील बीरशेबा वरिष्ठ माध्यमिक विद्यालयातून केलं. तर, केंद्रीय विद्यालयातून त्यांनी बारावी पूर्ण केली.

Success Story IPS Tripti Bhatt

पंतनगर विद्यापीठातून घेतली अभियांत्रिकीची पदवी

पंतनगर विद्यापीठातून अभियांत्रिकीचं पदवीचं शिक्षण पूर्ण केल्यानंतर, त्यांनी नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन (NTPC) मध्ये सहाय्यक व्यवस्थापक म्हणून काम केलं.

Success Story IPS Tripti Bhatt

ISRO कडूनही नोकरीची ऑफर

तृप्ती भट्ट यांनी UPSC परीक्षा यशस्वीपणे उत्तीर्ण होण्यापूर्वी 16 सरकारी नोकरीच्या ऑफर्स नाकारल्या होत्या. त्यांना इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन (ISRO) कडून नोकरीचीही ऑफर मिळाली होती.

Success Story IPS Tripti Bhatt

पहिल्याच प्रयत्नात UPSC उत्तीर्ण

तृप्ती यांनी पहिल्याच प्रयत्नात UPSC CSE 2013 ची परीक्षा उत्तीर्ण केली आणि IPS पदाची निवड करून 165 वा क्रमांक मिळवला.

Success Story IPS Tripti Bhatt

डेहराडूनमध्ये एसपी म्हणून कार्यरत

त्यानंतर तृप्ती यांची डेहराडूनमध्ये पोलीस अधीक्षक (SP) म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. त्यांनी चमोलीत एसपी म्हणून आणि नंतर टिहरी गढवालमध्ये SDRF च्या कमांडर म्हणून काम केलं. सध्या तृप्ती भट्ट डेहराडूनमध्ये गुप्तचर आणि सुरक्षा एसपी म्हणून तैनात आहेत.

Success Story IPS Tripti Bhatt

राम मंदिराची लढाई जिंकण्यासाठी 'हा' माणूस हिंदूंच्या पाठिशी हनुमानासारखा राहिला उभा!

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

येथे क्लिक करा