संतोष कानडे
चीन आणि पाकिस्तानच्या उरात धडकी भरेल अशी चाचणी आज भारतात झाली आहे
ब्रह्मोसच्या विस्तारित रेंजची यशस्वी चाचणी आज झाली
सुखोई विमानाने अचून लक्ष्य भेदून शत्रूला आपली ताकद दाखवून दिली आहे
२९ नोव्हेंबर रोजी जमिनीवरुन जमिनीवर मारा करणाऱ्या ब्रह्मोस सुपरसॉनिक क्रूझ मिसाईलचं टेस्टिंग झालं होतं
पाणी, जमीन आणि आकाश या तिन्ही आघाड्यांवर ब्रह्मोसच्या माध्यमातून भारताचं सुरक्षा कडं मजबुत झालं आहे
या क्षेपणास्राचं हवाई व्हर्जन २०१२ मध्ये आलं होतं. २०१९मध्ये या मिसाईलचा भारतीय वायुसेनमध्ये समावेश करण्यात आला
भारत सरकारने २५ डिसेंबर रोजी १२० प्रलय बॅलिस्टिक मिसाईच्या खरेदीला परवानगी दिलीय
हे क्षेपणास्त्र १५० ते ५०० किलोमीटरपर्यंतचे लक्ष्य भेदू शकतं. विशेष म्हणजे या क्षेपणास्त्रांची रेंज आवश्यकतेनुसार वाढवता येणार आहे
२०१५मध्ये प्रलय क्षेपणास्त्र विकसित करण्यासाठी काम सुरु झाले होते. दिवंगत जनरल बिपिन रावत यांनी या प्रोजेक्टवर भर दिला होता
ब्रह्मोसच्या यशस्वी प्रक्षेपणानंतर भारतासाठी ही यशस्वी झेप समजली जात आहे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.