Chinmay Jagtap
असं म्हणतात की अंबानी कित्येकदा जोखीम घेतात. जोखीम घ्यायला ते घाबरत नाही. यामुळे यशस्वी व्हायचं असेल तर जोखीम घेण अतिशय महत्त्वाच आहे.
स्वप्न बघितली तरच ती पूर्ण होतात. अशावेळी मोठी स्वप्न बघणं महत्त्वाचं आहे.
इतरांपेक्षा वेगळं, इतरांपेक्षा काहीतरी नवीन करण्यासाठी त्याविषयी विचार करणं अतिशय गरजेचे आहे. अशावेळी आपण काय विचार करतो यावरून आपण यशस्वी होऊ शकतो का? हे ठरत असतं
अंबानी नेहमीच संघर्ष करतात. ते कधीही खचत नाहीत. अपयश आलं तर पूर्ण ताकदीनं त्याच्या विरोधात संघर्ष करतात.
समजा तुम्हाला अंबानींसारखा चांगला टीम लीडर व्हायच असेल तर इतरांना प्रोत्साहन देणे अतिशय गरजेचे आहे. इतरांना प्रोत्साहन दिलं तर नक्कीच तुम्ही चांगले टीम लीडर व्हाल.
आपल्या सोबत असणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला असं वाटलं पाहिजे की त्या व्यक्तीवर आपला विश्वास आहे. विश्वासार्थ व्यक्तीला प्रोत्साहन देणे अतिशय गरजेच आहे.यामुळेच एक टीम लीडर बनतो.
आपण किती काम करतोय यापेक्षा आपण कसं काम करतोय हे महत्त्वाचं आहे म्हणजेच आपण आपलं काम व्यवस्थित करतोय का हे बघा अंबानी आपलं काम नेहमीच नीट नेटकेपणाने करतात असं म्हटलं जातं