Sudesh
अजून मे महिना सुरू झाला नाही, तेवढ्यातच कित्येक ठिकाणी नागरिक उकाड्याने हैराण झाले आहेत. अशामध्ये घरा-घरांमधील पंखे फुल स्पीडने फिरताना दिसत आहेत.
कित्येकांची अशी तक्रार असते, की घरातील पंखे नेमके उन्हाळ्यातच हळू चालतात.
उन्हाळ्यात फॅनचा स्पीड कमी होण्याची दोन मुख्य कारणं आहेत. यातील पहिलं कारण म्हणजे व्होल्टेज.
याचं दुसरं कारण म्हणजे, फॅनचा कन्डेन्सर कमकुमवत होणे. फॅनचा कन्डेन्सर वीक किंवा खराब झालेला सहसा लक्षात येत नाही.
कन्डेन्सर बदलून नवीन टाकल्यास फॅनचा स्पीड पुन्हा पहिल्यासारखा होईल.
दुसरा उपाय म्हणजे तुम्ही घराच्या मेन सप्लायमध्ये स्टेबलायझर बसवू शकता. यामुळे तुमच्या घरात येणाऱ्या विजेचं व्होल्टेज नियमित होईल, आणि फॅनला योग्य प्रकारे वीजपुरवठा मिळेल.
या दोन्ही गोष्टी केल्यानंतर देखील जर तुमच्या घरातील पंखा नीट काम करत नसेल, तर मेकॅनिकला बोलवून त्याची तपासणी करून घेणं गरजेचं आहे.