Monika Lonkar –Kumbhar
आजकाल अनेक जण कुत्रा आणि मांजर पाळतात. गावासोबतच आता शहरांमध्ये कुत्रा आणि मांजर सर्रासपणे पाळले जात आहेत.
सध्या सगळीकडे प्रचंड उकाडा आहे. या उष्णतेचा त्रास माणसांसोबतच प्राण्यांना ही होतो. त्यामुळे, या दिवसांमध्ये त्यांची काळजी घेणे गरजेचे आहे.
हे दोन्ही प्राणी घरात असल्यावर सगळ्यांच्या आनंदाला जणू उधाणच येते. सध्या वातावरणातील उष्णता वाढली आहे. याचा तुमच्या पाळीव प्राण्यांवर परिणाम होण्याची शक्यता असते.
उन्हाळ्यात तुमच्या लाडक्या पेटची काळजी घेण्यासाठी त्याच्या आहाराकडे कटाक्षाने लक्ष द्या. त्यांना पोषक आहार द्या.
या दिवसांमध्ये प्राण्यांचे उन्हापासून संरक्षण करण्यासाठी त्यांची थंड जागेत राहण्याची जरूर सोय करा. यामुळे, त्यांना कडक उन्हाचा त्रास होणार नाही.
उन्हाळ्यात जशी आपल्या शरीरात पाण्याची कमतरता निर्माण होते, तशी प्राण्यांना ही पाण्याची कमतरता भासते. त्यामुळे, त्यांना स्वच्छ भांड्यात पाणी प्यायला द्या.
कुत्रा, मांजर यांना खेळण्यासाठी बॉल अवश्य खेळायला द्या, यामुळे त्यांचे शारिरीक आणि मानसिक आरोग्य चांगले राहते.