Monika Lonkar –Kumbhar
एप्रिल महिन्याची सुरूवात कडक उन्हाळ्याने झाली आहे. त्यामुळे, सध्या सगळीकडे प्रचंड उकाडा आहे
या वातावरणात मग गरमीपासून दूर जाऊन कुठेतरी थंड हवेच्या ठिकाणी जावे, असे सगळ्यांना वाटते.
उन्हाळ्यात लहान मुलांना सुट्ट्या देखील लागतात. त्यामुळे, या दिवसांमध्ये तुम्ही मुलांसोबत फिरायला जाण्याचा प्लॅन नक्कीच बनवू शकता.
थंड हवेसाठी प्रसिद्ध असलेल्या या हिल स्टेशनला भेट दिल्यावर तुम्हाला अनेक प्रेक्षणीय स्थळे पाहता येतील.
महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध थंड हवेचे ठिकाण म्हणून भंडारदऱ्याची खास ओळख आहे. अहमदनगर जिल्ह्यात स्थित असलेले हे ठिकाण ट्रेकिंगसाठी प्रसिद्ध आहे.
भंडारदऱ्याला गेल्यावर तुम्ही कळसूबाई शिखर, रतनगढ किल्ला इत्यादी पर्यटन स्थळांना ही भेट देऊ शकता.
नाशिक जिल्ह्यात स्थित असलेले हे ठिकाण घनदाट जंगले, पश्चिम घाट, ऐतिहासिक किल्ले आणि मनमोहक निसर्गाने वेढलेले आहे. त्यामुळेच, या ठिकाणी निसर्गप्रेमींची नेहमीच गर्दी पहायला मिळते.