Anuradha Vipat
'द कपिल शर्मा शो'मध्ये कपिलच्या पत्नीच्या भूमिकेत दिसणारी अभिनेत्री सुमोना चक्रवर्ती
सुमोना अचानक शोमधून गायब झाल्याने विविध चर्चांना उधाण आलं होतं.
कपिलने तिला शोमधून काढून टाकल्याच्याही चर्चा होत्या.
त्यावर अखेर सुमोनाने मौन सोडलं आहे.
सुमोना म्हणाली, कपिलच्या शोमधील सुमोनाच्या भूमिकेला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत होता. मात्र तरीही तिला शोमधून का काढण्यात आलं, असे प्रश्न चाहत्यांच्या मनात उपस्थित झाले होते.
मात्र मी स्वत:हूनच शोमधून बाहेर पडल्याचं सुमोनाने यावेळी स्पष्ट केलं.
सुमोनाने 1999 मध्ये आमिर खानच्या ‘मन’ या चित्रपटातून बालकलाकार म्हणून तिच्या करिअरची सुरुवात केली होती.