सनबर्नमुळे त्रस्त आहात? मग, करा हे घरगुती उपाय

Monika Lonkar –Kumbhar

उन्हाळा

उद्यापासून मे महिन्याला सुरूवात होतेय आणि वातावरणातील उकाडा प्रचंड वाढला आहे.

सनबर्न

वाढत्या उष्णतेचा आरोग्यावर, त्वचेवर आणि केसांवर ही परिणाम होतो. उन्हाच्या तीव्र झळांमुळे चेहऱ्यावर सनबर्न आणि टॅनिंगची समस्या वाढते.

उन्हाच्या झळांमुळे त्वचेवर लाल चट्टे उमटतात. त्यामुळे, त्वचेची काळजी घेणे गरजेचे आहे. यासाठी तुम्ही काही घरगुती उपायांची मदत घेऊ शकता.

बर्फ

सनबर्नपासून त्वचेचा बचाव करण्यासाठी एका सूती कापडामध्ये बर्फाचे क्यूब्स घ्या. त्यानंतर, ते चेहऱ्यावर फिरवा.

ग्रीन टी

सनबर्नपासून त्वचेचा बचाव करण्यासाठी ग्रीन टी वॉटर किंवा ग्रीन टी बॅग चेहऱ्यावर काही वेळ लावू शकता.

खोबरेल तेल

त्वचा थंड पाण्याने स्वच्छ धुवा. त्यानंतर, चेहरा कोरडा झाल्यानंतर खोबरेल तेलाच्या मदतीने चेहऱ्यावर मसाज करा.

कोरफड

सनबर्नपासून त्वचेचा बचाव करण्यासाठी कोरफड अतिशय फायदेशीर आहे. तुम्ही कोरफड जेलचा ही चेहऱ्यावर वापर करू शकता.

आरोग्यासाठी फायदेशीर आहे बदाम तेल, जाणून घ्या फायदे

येथे क्लिक करा.