वडील जिकडे वेटर म्हणून काम करायचे तीच जागा सुनील शेट्टींनी विकत घेतली

सकाळ डिजिटल टीम

सुनील शेट्टी

बॉलिवूड एकेकाळी गाजवणारा अभिनेता सुनील शेट्टी एक उत्तम बिझनेसमन म्हणून प्रसिद्ध आहेत.

पॉडकास्ट व्हायरल

सुनील शेट्टी यांनी नुकतीच भारती सिंह आणि हर्ष लिंबाचिया यांच्या पॉडकास्टला हजेरी लावली.

वडिलांविषयी सांगताना भावूक

वडिलांविषयी या पॉडकास्टवर बोलताना सुनील शेट्टी भावूक झाला. त्यांचे वडील लहान असताना मंगलोरवरून पळून आले होते असं सांगितलं होतं.

वेटर म्हणून केलं काम

सुनील शेट्टी यांच्या वडिलांनी वेटर म्हणून यांनी काही हॉटेलमध्ये काम केलं. सुरुवातील आत्यानी टेबल पुसायचं मग वेटर आणि नंतर हॉटेलमध्ये मॅनेजर म्हणून काम केलं.

हॉटेलचे झाले मालक

इतकंच नाही तर सुनील यांच्या वडिलांनी त्यानंतर स्वतःचं हॉटेलसुद्धा सुरु केलं.

वडिलांनी कष्ट केलेली जागा घेतली विकत

सुनील यांनी फिल्म इंडस्ट्रीत प्रसिद्धी मिळवल्यावर त्यांच्या वडिलांनी जिथे वेटर म्हणून काम केलं होतं त्या तीन जागा विकत घेतल्या.

येथे क्लिक करा