सुनील छेत्रीचा पाणावलेल्या डोळ्यांनी फुटबॉलला अलविदा

Pranali Kodre

19 वर्षांच्या कारकिर्दीची अखेर

भारताचा महान फुटबॉलपटू सुनील छेत्रीच्या 19 वर्षांच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीची 6 जून 2024 रोजी अखेर झाली.

Sunil Chhetri | Sakal

शेवटचा सामना

फिफा वर्ल्ड कप पात्रता फेरीतील भारत विरुद्ध कुवेत यांच्यात कोलकातामध्ये झालेला सामना गोलशुन्य बरोबरीत संपला अन् छेत्रीच्या कारकिर्दीचाही शेवट झाला.

Sunil Chhetri | Sakal

भावनिक वातावरण

जेव्हा सामना संपल्याचे रेफ्रींनी घोषित केले, तेव्हा स्टेडियममधील संपूर्ण वातावरण भावनिक झाले.

Sunil Chhetri | X/IndianFootball

चाहत्यांचे आभार

छेत्रीने सामन्यानंतर संपूर्ण स्टेडियमला फेरी मारत सर्व प्रेक्षकांचे आणि चाहत्यांचे आभार मानले.

Sunil Chhetri | Sakal

पाणावलेले डोळे

या सामन्यासाठी 58 हजारांहून अधिक प्रेक्षक स्टेडियममध्ये उपस्थित होते. चाहत्यांचे आभार मानताना छेत्रीचे डोळेही पाणावले होते.

Sunil Chhetri | Sakal

गार्ड ऑफ ऑनर

यानंतर भारतीय खेळाडूंनी आणि सपोर्ट स्टाफने छेत्रीला गार्ड ऑफ ऑनर दिला, तेव्हा मात्र त्याला त्याचे अश्रु रोखता आले नाही.

Sunil Chhetri | Sakal

आंतरराष्ट्रीय कारकिर्द

सुनील छेत्रीने त्याच्या कारकिर्दीत 151 आंतरराष्ट्रीय सामने खेळले, ज्यात त्याने 94 गोल केले आहेत. तो 88 सामने कर्णधार म्हणून खेळलाय.

Sunil Chhetri | Sakal

निरोपाची वेळ... सुनील छेत्रीची शेवटच्या सामन्याआधी भावुक पोस्ट

Sunil Chhetri | X/IndianFootball
येथे क्लिक करा