सुनील छेत्रीचे खास विक्रम अन् पुरस्कार

Pranali Kodre

निवृत्तीची घोषणा

भारतीय फुटबॉलचा महान खेळाडू सुनील छेत्रीने फुटबॉलमधून 16 मे रोजी निवृत्ती जाहीर केली.

Sunil Chhetri | X/IndianFootball

शेवटचा सामना

कुवेतविरुद्ध 6 जून रोजी होणारा विश्वकरंडक फुटबॉल पात्रता स्पर्धेतील सामना हा छेत्रीचा अखेरचा सामना असणार आहे.

Sunil Chhetri | X/IndianFootball

आंतरराष्ट्रीय गोल

साल 2005 मध्ये भारतासाठी पदार्पण करणाऱ्या छेत्रीने आत्तापर्यंत 150 आंतरराष्ट्रीय सामने खेळले, ज्यात त्याने 94 गोल केले आहेत. तो 87 सामने कर्णधार म्हणून खेळलाय.

Sunil Chhetri | X/IndianFootball

पहिला भारतीय

आंतरराष्ट्रीय फुटबॉलमध्ये 50 गोल करणारा तो भारताचा पहिला फुटबॉलपटू आहे.

Sunil Chhetri | X/IndianFootball

सर्वाधिक गोल

ख्रिस्तियानो रोनाल्डो, अली दाई आणि लिओनेल मेस्सी यांच्यानंतर आंतरराष्ट्रीय फुटबॉलमध्ये सर्वाधिक गोल करणाऱ्यांमध्ये छेत्री चौथ्या क्रमांकावर आहे.

Sunil Chhetri | X/IndianFootball

हॅट्रिक

छेत्रीन भारतासाठी चारवेळा गोलची हॅट्रिक साजरी केली आहे.

Sunil Chhetri | X/IndianFootball

अंतिम सामन्यातील स्टार

त्याने SAFF स्पर्धेच्या 2011, 2015-16 आणि 2021 च्या अंतिम सामन्यात गोल केले आहेत.

Sunil Chhetri | X/IndianFootball

एकमेव भारतीय

आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील पहिल्या, 50 व्या, 100 व्या आणि 150 व्या सामन्यात गोल करणारा तो एकमेव भारतीय आहे.

Sunil Chhetri | X/IndianFootball

विजेतीपदं

त्याने कारकि‍र्दीत नेहरु कप (2007, 2009, 2012), एफसी चॅलेंज कप (2008), सॅफ स्पर्धा (2011, 2015, 2021, 2023), इंटर कॉन्टिनेंटल कप (2018, 2023) आणि ट्रायनेशन सिरिज (2017, 2023) या स्पर्धा जिंकल्या आहेत.

Sunil Chhetri | X/IndianFootball

क्लब

तो भारताव्यतिरिक्त मोहन बगान, इस्ट बंगाल, डेम्पो क्लब, चिराग युनायटेड, कानसास सिटी विझार्ड, स्पोर्टिंग सीपीबी, चर्चिल ब्रदर्स, बेंगळुरु एफसी, मुंबई सिटी एफसी या क्लबकडूनही खेळला आहे.

Sunil Chhetri | X/IndianFootball

पुरस्कार

छेत्रीला पद्मश्री (2019), खेलरत्न (2021), अर्जुन पुरस्कार (2011) अशा पुरस्कारांनीही गौरविण्यात आल आहे.

Sunil Chhetri | X/IndianFootball

Forbes: 2024 मध्ये सर्वाधिक कमाई करणारे जगातील टॉप-10 खेळाडू

Highest Paid Athlete | Sakal
येथे क्लिक करा