धोनी, विराटपेक्षाही भारी.. कॅप्टन रोहितची गावसकरांनी पाठ थोपटली

अनिरुद्ध संकपाळ

भारताने अफगाणिस्तानविरूद्धची मालिका 3 - 0 ने जिंकली. शेवटच्या सामन्यात कर्णधार रोहित शर्माने एकहाती सामना जिंकून दिला.

या विजयानंतर भारताचे माजी कर्णधार सुनिल गावसकर यांनी रोहित शर्माची पाठ थोपटली.

क्रिकबझशी बोलताना गावसकर यांनी सांगितले की टी 20 क्रिकेटमध्ये कर्णधार म्हणून तुमचा कस लागतो.

रोहित शर्माचे विनिंग पर्सेंटेज जर महेंद्रसिंह धोनी आणि विराट कोहली यांच्यापेक्षा चांगले असेल तर हे रोहित कर्णधार म्हणून उत्तम आहे.

टी 20 क्रिकेट सध्या फक्त हाणामारीचा गेम झाला आहे. मात्र रोहित शर्मा आणि रिंकू सिंहने 4 बाद 22 धावा अशी अवस्था झाली असताना चांगला खेळ केला.

त्यांनी हुशारीने खेळ केला. त्यांनी स्वतःला थोडा वेळ दिली अन् नंतर फटकेबाजी केली. जर आपण तिथं दोन विकेट्स गमावल्या असत्या तर आपला 70 धावात डाव संपुष्टात आला असता.

मात्र रोहित - रिंकूने डाव सावरत शेवटच्या पाच षटकात 100 धावा ठोकल्या. मात्र हा सामना अपवाद होता. तुम्ही सहसा असं खेळत नाही. मात्र गरज भासली तर हुशारीने क्रिकेट खेळणंही महत्वाचं असतं.

सुमित नागल हरला तरी मिळाले 1 कोटी रूपये

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

येथे क्लिक करा