Pranali Kodre
आयपीएल 2024 स्पर्धेतील क्वालिफायर-2 सामन्यात सनरायझर्स हैदराबादने राजस्थान रॉयल्सला 36 धावांनी पराभूत केले.
या विजयासह सनराझर्स हैदराबादने आयपीएल 2024 स्पर्धेच्या अंतिम सामन्यात धडक मारली आहे.
विशेष म्हणजे सनरायझर्स हैदराबाद संघ गेल्यावर्षी म्हणजेच आयपीएल 2023 स्पर्धेत पाँइंट्स टेबलमध्ये सर्वात शेवटच्या 10 व्या क्रमांकावर राहिला होता.
मात्र, 2024 मध्ये हैदराबादने जबरदस्त पुनरागमन करत अंतिम सामन्यात प्रवेश मिळवला आहे.
त्यामुळे आयपीएलमध्ये असं दुसऱ्यांदाच घडलं की आदल्या वर्षी शेवटच्या क्रमांकावर राहिलेल्या संघाने दुसऱ्या वर्षी अंतिम फेरी गाठली.
सर्वात आधी असा पराक्रम डेक्कन चार्जर्सने केला होता. 2008 मध्ये त्यांना शेवटच्या 8व्या क्रमांकावर रहावे लागले होते. पण 2009 मध्ये त्यांनी अंतिम सामना गाठली.
इतकेच नाहीतर डेक्कनने 2009 मध्ये विजेतेपदालाही गवसणी घातली होती.
त्यामुळे आता हैदराबाद अंतिम सामन्यात तर पोहचलेत, पण आता डेक्कनच्या विजेतेपद मिळवण्याच्या कामगिरीची पुनरागवृत्ती यंदा ते करू शकणार का? याची उत्सुकता चाहत्यांमध्ये आहे.
अंतिम सामना 26 मे रोजी सनरायझर्स हैदराबाद आणि कोलकाता नाईट रायडर्स संघात चेन्नईला होणार आहे.