Monika Lonkar –Kumbhar
सध्या देशातील अनेक भागांमध्ये उष्णता प्रचंड वाढली आहे.
उष्णतेपासून बचाव करण्यासाठी आपण आरोग्याची आणि खास करून त्वचेची काळजी घेतो.
उन्हाळ्यात त्वचेवर सनस्क्रिन आवर्जून लावले जाते. परंतु, सनस्क्रिन लावण्यापूर्वी काही गोष्टी लक्षात ठेवणे गरजेचे आहे. कोणत्या आहेत त्या गोष्टी? जाणून घेऊयात.
जर तुम्ही पहिल्यांदाच सनस्क्रिन खरेदी करत असाल तर सनस्क्रिनचा एसपीएफ (SPF) किमान ४० पर्यंत असायला हवा हे लक्षात घ्या
सनस्क्रिन लावताना त्याचे किती प्रमाण असावे? याकडे प्रामुख्याने लक्ष द्या. सनस्क्रिन लावल्यानंतर ते त्वचेवर पूर्णपणे सुकू द्या.
तुम्ही घराबाहेर पडताना सनस्क्रिन अवश्य लावा. परंतु, यासोबतच घरात असल्यावर ही सनस्क्रिन लावायला विसरू नका.
कारण, घरामध्ये असतानाही सूर्याच्या अतिनील किरणांचा तुमच्या त्वचेवर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे, घरी असतानाही त्वचेवर सनस्क्रिनचा वापर करायला विसरू नका.