धनश्री भावसार-बगाडे
उन्हाळ्यात बडिशेप खाणं फार फायद्याचं असतं. बडिशेपची प्रकृती थंड असल्याने उपयुक्त ठरते.
बडिशेप खाल्ल्याने शरीर आतून थंड राहतं. पोटातली उष्णता कमी होते.
बडिशेपमध्ये व्हिटॅमिन, कॅल्शियम, फायबर, आयर्न, पोटॅशियम, मॅग्नेशियम असे विविध पोषक तत्व असतात.
बडिशेपमधल्या या पोषक तत्वांमुळे उन्हाळ्यात होणाऱ्या बऱ्याच त्रासांपासून आराम मिळतो.
बडिशेपमुळे पचन चांगले होत असल्याने पोटाचे, पचनाचे त्रास टळतात.
जर सकाळी उठल्याबरोबर तुम्हाला चहा प्यायची सवय असेल तर हा बडिशेपचा चहा उन्हाळ्यात फार उपयुक्त ठरतो. पचनही सुधारते.
एक कप चहाच्या पाण्यात बडिशेप टाकून उकळून घ्या. गार झाल्यावर गाळून प्या. यात मध किंवा गुळ घालून पिऊ शकतात.
उन्हाळ्यात इतर कोणतंही कोल्ड्रींक पिण्यापेक्षा बडिशेपचं सरबत प्यावं. यामुळे अपचन, गॅस यासारख्या त्रासातून आराम मिळतो. पोटाला गारवा मिळतो.
एक ग्लास पाणी, एक चमचा बडिशेप, ३-४ पुदिन्याची पानं मिक्सरमध्ये निट मिक्स करून गाळून घ्या. त्यात मध घालून प्या.
उन्हाळ्यात बडिशेप खडीसाखरेचं पाणी फार उपयुक्त ठरते. यात व्हिटॅमिन, कॅल्शियम, फायबर आणि अँटीऑक्सिडंट असे पोषकतत्वे आहेत. यात अँटीबॅक्टेरीयल आणि अँटीफंगल गुणही आहेत.
बडिशेप खडीसाखरेचे पाणी शरीर गार ठेवतं. उन्हाळ्यात हायड्रेट ठेवते. पोटातली आग कमी होते. उन्हाळ्यात होणारे त्रास कमी होतात.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.